Ad will apear here
Next
‘सूरमा भोपाली’ कालवश
२९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात जगदीप यांचा जन्म झाला. सय्यद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. जगदीप अभिनयास सुरुवात बालकलाकार म्हणून बी. आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बालकलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट - अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरुवात केली. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची मजबूत छाप उमटवली. ‘शोले’ सिनेमातील भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शनदेखील केले. 

जगदीप यांनी मच्छर इन पुराना मंदिर, अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुर्बानी, शहेनशाह यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. जगदीप यांनी हिंदी सिनेमात अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. अभिनेता जावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचा दुसरा पुत्र नावेद जाफरी आहे. नावेद व जावेद जाफरी यांनी ‘बुगी वुगी’ची निर्मिती केली आहे. 

८ जुलै २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(संकलन : संजीव वेलणकर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VYQICO
Similar Posts
उत्पल दत्त, जगदीप, भार्गवी चिरमुले, धुमाळ हिंदी, बंगाली सिनेमातील अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, नाटककार उत्पल दत्त, सूरमा भोपाली या नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेले अभिनेते आणि विनोदवीर जगदीप, मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी आणि चरित्र कलाकार म्हणून ओळखले जाणारे मराठमोळे अभिनेते धुमाळ यांचा २९ मार्च हा जन्मदिन
बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन आज दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन. जन्म. १७ जुलै १९३० नाशिक येथे. बाबूराव बागुल मूळचे नाशिकचे. ‘वेदाआधी तू होतास...वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास...तुझ्यामुळेच सजीवसुंदर झाली ही मही...’ यासारखी मानवाचा नव्याने वेध घेणारी विद्रोही कविता लिहिणारे बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक
रणजितसिंग यांचा स्मृतिदिन आज एका शूर, मुत्सद्दी, युद्धशास्त्रज्ञ, पराक्रमी, शिकारी रणजितसिंग यांचा स्मृतिदिन. जन्म. १३ नोव्हेंबर १७८० पाकिस्तानमध्ये गेलेल्या गुजरानवाला प्रांतात. रणजितसिंग यांचा जन्म संधावालिया घराण्यात महाराजा सुकरचाकीया आणि राणी राज कौर यांच्या पोटी झाला. रणजितसिंग' यांचा एकंदर जीवनकाल ५९ वर्षांचा. वडिल
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language